पुणे शहर

भाजपच्या वतीने किरकटवाडी येथे विकास आराखड्यावर चर्चासत्राचे आयोजन..

विकास आराखडा होत असताना नागरिकांनी सामूहिक हिताच्या सूचना व हरकतींवर भर दिला पाहिजे : पेठे

पुणे : pune city नवीन हद्दीतील नागरिकांनी या भागाचा नव्याने विकास होत असताना विकास आराखड्याचा योग्य अभ्यास करून आपल्या सामुहिक हिताच्या सुचना तसेच आपल्या तक्रारी या विषयी हरकतींवर भर दिला पाहिजे, तरच विकासाचे एक सर्वसमावेशक योग्य मॅाडेल उभे राहू शकेल असे मत आराखडा अभ्यासक इंजिनिअर चेतन पेठे यांनी व्यक्त केले.

भाजपा आपल्या दारी उपक्रमांतर्गत पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने सामावेश झालेल्या गावांच्या विकास आराखडा ( २०२१ – २०४१ ) या विषयावर माहिती आणि चर्चासत्राचे किरकटवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पेठे बोलत होते. अनेक शेतकरी आणि नागरिकांनी आराखड्याविषयी आपले प्रश्न ,अडचणी या चर्चासत्रात मांडल्या.

Img 20210822 wa0169

किरकटवाडी , नांदोशी गावातील जवळपास १०० शेतकरी आणि नागरिक यावेळी उपस्थित असलेल्या या चर्चासत्रास आराखडा अभ्यासक इंजिनिअर चेतन पेठे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी चर्चासत्रास भाजप सहकार आघाडीचे शहराध्यक्ष सचिन दांगट, पालक नगरसेवक हरिदास चरवड , नगरसेविका निता दांगट, खडकवासला अध्यक्ष सचिन मोरे , अनंत दांगट , किशोर पोकळे , किरकटवाडी गावाचे सरपंच गोकुळ करंजावणे , नांदोशी गावाचे सरपंच भाऊसाहेब किवळे , सहकार आघाडी उपाध्यक्ष निळकंठ शेळके , किरण हगवणे , अनिल मते , शेखर हगवणे , सचिन दगडे यांच्यासह आजी माजी ग्रामपंचायत सभासद , नागरिक  उपस्थित होते .

शेतकरी,नागरिक संयोजक पालक नगरसेवक आणि पेठे यांच्यात झालेल्या चर्चासत्रात अनेकांचे प्रश्न , त्यांच्या शंकाचे निरसन होण्यास नक्कीच मदत होईल अशी आशा यावेळी संयोजकांनी व्यक्त केली . कार्यक्रमाचे संयोजन पालक नगरसेवक निता दांगट , नगरसेवक हरिदास चरवड आणि सहकार आघाडी अध्यक्ष सचिन दशरथ दांगट यांनी केले होते .

Img 20210818 wa0002

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये