पुणे शहर

आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधीस्थळाच्या कामाचा शुभारंभ

राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप व माजी मंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : संगमवाडी येथील क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे राष्ट्रीय स्मारकाच्या सीमा भिंत  रस्ता, जमिन लेवलिंग, साफसफाई , सुरक्षा व्यवस्था या कामाचा शुभारंभ राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप तसेच माजी गृहराज्यमंत्री व मातंग समाजाचे नेते रमेश बागवे यांच्या शुभहस्ते पाडव्याच्या शुभमुहुर्तावर संपन्न झाला.क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती महाराष्ट्र  शासन अध्यक्ष विजयबापू डाकले यांनी आयोजन केले होते.

      प्रशांत जगताप म्हणाले,  गेली अनेक दशके समाजाने व लहुप्रेमींनी खूप संघर्षकरून, प्रयत्न करून सुद्धा या समाधीस्थळाच्या कामाचा निर्णय होऊ शकला नव्हता. पण अजितदादांच्या सकारात्मक प्रयत्नामुळे महाविकास आघाडी सरकार असताना हा निर्णय झाला. विजयबापु डाकले सारख्या कार्यक्षम आणि समाजहित जपणा-या कार्यकर्त्याची समितीच्या अध्यक्षपदी निवड होताच त्यांनी सहकारी सदस्यासह सरकार दरबारी प्रचंड पाठपुरावा केला. निधी आणला, जागा संपादीत करुन घेतली याबरोबरच संबंधीत ईतर कामे व्हावीत म्हणुन सतत कामाचा धडाका लावला.

Img 20221021 wa00011331728156984263886

विजय डाकले म्हणाले,महाविकास आघाडी सरकारने स्मारकाच्या भुसंपादन कामासाठी तब्बल ८८ कोटी रुपये पुणे महानगरपालिकेस वर्ग देखील केले. जागेचे भुसंपादन झाले यामुळेच आजचे भूमिपूजन होऊ शकले. या सर्व बाबींची माझ्या मातंग समाजातील समाजबांधव तसेच आद्यक्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे प्रेमी कायम नोंद ठेवतील याची मला खात्री आहे.

आज या प्रसंगी रमेश बागवे आनि प्रशांत जगताप यांनी समितीचे अध्यक्ष विजयबापु डाकले तसेच समिती सदस्य बाळासाहेब भांडे, रवी पाटोळे, राम कसबे, डॅा. राजु आडागळे , शांतीलाल मिसाळ यांचे विशेष कौतुक केले. यावेळी अनिलराव हातागळे , राजु साने, आरपीआय युवक अध्यक्ष विरेन हनुमंत साठे, सचिन डाकले, अक्षय शिंदे हे मान्यवर हजर होते.

Png 20221024 133102 0000 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये