पुणे शहर

श्रद्धा वालकर हत्येच्या निषेधार्थ कोथरूडमध्ये झाली आक्रोश सभा..आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी

पुणे : दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्येविरोधात कोथरुड मधील हुतात्मा राजगुरू चौकात आक्रोश सभा घेण्यात आली. यावेळी या घटनेचा तीव्र शब्दात घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला.

या आक्रोश सभेत हिंदुत्ववादी संघटना, राजकीय पक्ष, नागरिक, मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. असे कृत्य करणाऱ्या नराधमाला अशी शिक्षा द्या की पुन्हा असे कृत्य करण्याचे धाडस कोण करणार नाही अशी मागणी यावेळी उपस्थित महिला वर्गाने केली.

डेटिंग साईट बंद करा, मुलींनी अशी फसवणूक टाळण्यासाठी सतर्क रहा, कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या आईवडिलांचा विचार करा असे आवाहन यावेळी करण्यात आले. या घटनेला लव्ह जिहाद जबाबदार असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून अपराध्याला कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी हिंदुत्ववादी संघटनांनी केली.

Fb img 1647413711531 1

या घटनेविरोधातील नागरिकांच्या मनात असलेला संताप यावेळी दिसून आला. अशा घटना होऊ नयेत यासाठी सर्वांनीच सतर्क राहण्याची गरज असल्याचा सूर सभेत निघाला.

Img 20221012 192956 045 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये