पुणे शहर

नंदनवन मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शहरात रक्ताची कमतरता भासू लागली असल्याने वेळेची गरज आणि सामाजिक बांधिलकीचे भान लक्षात घेऊन नंदनवन मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत ९१ जणांनी रक्तदान केले.

या रक्तदान शिबीराला जास्त युवकांनी रक्तदान केले हे उल्लेखनीय आहे. आजच्या या कठीण काळात युवा वर्ग पुढे सरसावतो आहे हे पाहून खूप अभिमान वाटतो.पुणे बल्ड बॅंक च्या सहकार्याने हे शिबीर घेण्यात आले. सध्या कोरोना संसर्गामुळे शहरात रक्ताचा तुटवडा जाणवत असुन तो भरुन काढण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  व आमदार रोहीत पवार यांनी केलेल्या आवाहनानुसार या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याचे ऋषिकेश कडू यांनी सांगितले.

Img 20210430 wa0001

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये