पुणे शहर

बाणेर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर महिला कार्याध्यक्षा पुनम विशाल विधाते यांचे सासरे कै. बाबुराव चिंधू विधाते व कै. संतोष बाळासाहेब विधाते यांच्या तृतीय पुण्यस्मरण सोहळ्या निमीत्ताने  ह.भ.प. माऊली महाराज कदम (छोटे माऊली) यांचे कीर्तन संपन्न

पूनम विशाल विधाते आणि विशाल विधाते यांच्या वतीने आयोजन 

पुणे : बाणेर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर महिला कार्याध्यक्षा पुनम विशाल विधाते यांचे सासरे कै. बाबुराव चिंधू विधाते व दीर कै. संतोष बाळासाहेब विधाते यांच्या तृतीय पुण्यस्मरण सोहळा आज मोठ्या भक्तिभावाने पार पडला. 

या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने ह.भ.प. माऊली महाराज कदम (छोटे माऊली) यांचे कीर्तन संपन्न झाले. भावपूर्ण कीर्तनाने उपस्थित सर्वांना आध्यात्मिक अनुभव लाभला, मनात श्रद्धेची भावना प्रकट झाली आणि डोळ्यांत आनंदाश्रूंचा प्रवाह उभा राहिला. 

Fb img 17600956683617885001574683864714

या सोहळ्याला भोर राजगड मुळशीचे आमदार शंकर भाऊ मांडेकर, ह.भ.प.समाजभूषण शांताराम महाराज निम्हण,मृदूंगाचार्य ह.भ.प. पांडुरंग आप्पा दातार,मुळशी पंचायत समितीच्या माजी सभापती सारिकाताई शंकर मांडेकर,माजी उपसभापती बाळासाहेब चांदेरे,माजी नगरसेवक प्रमोद अण्णा निम्हण ,माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेवक रोहिणी चिमटे, माजी नगरसेवक सनी निम्हण,बाणेरचे प्रथम नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर,माजी नगरसेवक कैलास गायकवाड ,माजी पंचायत समिती सदस्य अशोक मुरकुटे, पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक दत्ता गायकवाड, ह.भ.प. मारुती कोकाटे, ह.भ.प. निवृत्ती आबा कोळेकर,गोसेवक ह.भ.प.संजय बापू बालवडकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष पुणे शहर प्रदीप दादा देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले, भाजप नेते गणेश कळमकर,युवा नेते राहुलदादा बालवडकर,युवा नेते श्याम जगताप व पंचक्रोशी मधील समस्त वारकरी संप्रदायातील मंडळी व ग्रामस्थ मंडळी यांनी उपस्थित होती. सर्व उपस्थितांनी एकत्र येऊन या पुण्यस्मरणात सहभाग नोंदवला, आदरांजली वाहिली आणि श्रद्धांजली व्यक्त केली.

Fb img 17600962531127292045910053398839
Screenshot 2025 1010 1727241846419585698491751
Img 20251004 wa0000148917864967549286
Img 20251008 wa00636567720300341058591
Img 20251007 wa00042267687006491955862

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये