महाराष्ट्र

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन

मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 93 व्या वर्षी प्राणज्योत मालवली. याबद्दलची माहिती त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी दिली आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक रमेश देव यांचा जन्म 30 जानेवारी 1929 कोल्हापुर येथे झाला. ‘आनंद’ या चित्रपटातील भूमिकेसाठी ते ओळखले जातात. 1956  साली रमेश देव यांनी आंधळा मागतो एक डोळा या चित्रपटातून त्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. तर आरती हा त्यांचा बॉलीवूडमधील पहिला चित्रपट होता.  रमेश देव यांनी दिग्दर्शन तसेच अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांची निर्मिती केली आहे. त्यांनी पैशाचा पाऊस आणि भाग्यलक्ष्मी या चित्रपटांत काम केले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये