महाराष्ट्र

मुंबईत ताडदेव येथे इमारतीला आग; ६ जणांचा मृत्यू


मुंबई : ताडदेव परिसरात एका 20 मजली इमारतीत भीषण आग लागली आहे. इमारतीच्या 18 व्या मजल्यावर ही आग लागली आहे. या आगीत ११ जण जखमी झाले आहेत. तर ६ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी 13 अग्निशमन बंब, 7 जम्बो टँकरसह घटनास्थळी पोहोचले. कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने ही माहिती दिली आहे.

भाटिया रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, ११ जण जखमी झाले असून, त्या सर्वांना जनरल वॉर्डात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Img 20220118 wa0213
Img 20211231 wa00066164473394770712000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये