पुणे शहर

2024 च्या निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवून, दोन कोटी पेक्षा जास्त मते मिळवायची आहेत- चंद्रकांत पाटील

पुणे: 2024 च्या निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवून, दोन कोटी पेक्षा जास्त मते मिळवायची आहेत.संघटन वाढीसह कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक पक्की करावी.भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा संकल्प केला आहे.By contesting the 2024 elections on their own, they want to get more than two crore votes – Chandrakant Patil

भारतीय जनता पक्षाच्या 41 व्या स्थापना दिनानिमित्त पुणे शहर भाजपा कार्यालयात आयोजित व्हर्चुअल रॅलीला मा. पाटील संबोधित करत होते. या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते.

IMG 20210223 WA0156

2014 च्या विधानसभा निवडणुकीत आपण स्वबळावर लढून आपल्याला 122 जागा मिळाल्या. या निवडणुकीत आपल्याला एक कोटी 47 लाख मते मिळाली. 2019 च्या निवडणुकीत शंभर जागा कमी लढूनही आपल्याला एक कोटी 42 लाख मते मिळाली. 2024 च्या निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवून, दोन कोटी पेक्षा जास्त मते मिळवायची आहेत. यासाठी बूथ रचना अतिशय सक्षम झाली पाहिजे.

भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन यंदा साजरा होत असताना भविष्याच्या दृष्टीकोनातून संघटना वाढीसह पक्षातील नव्या कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक पक्की होणे गरजेचे आहे. त्यासाठी अभ्यास वर्गाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जावेत, असा संकल्प भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

  पाटील म्हणाले की, आगामी काळात भाजपा विरुद्ध इतर असाच राजकीय आणि वैचारिक संघर्ष होणार आहे. छत्तीसगडमधील घटना अतिशय वेदनादायीच आहे. देशभरात एक सुप्त संघर्ष सुरु आहे. हे सुप्त संघर्ष निर्माण करणारे स्लीपर सेल अतिशय शांतपणे आपल्या विरोधात संघर्ष निर्माण करत आहेत. त्यामुळे आगामी काळात जो वैचारिक संघर्ष होईल, तो प्रामुख्याने आपण विरुद्ध इतर असाच होणार आहे.

खा. गिरीश बापट म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा कोणी एका व्यक्तीने स्थापन केलेला नाही. त्यामुळे कुठल्याच एखाद्या कुटुंबाची यावर मालकी राहिलेली नाही. हा पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष राहिला आहे. आपल्या नेत्यांनी देखील आपल्या कामामधून एक आदर्श सर्वांसमोर ठेवला. त्यामुळे कार्यकर्ता हा या पक्षाचा प्राण आहे. कारण, आपली वैचारिक बैठक पक्की आहे. महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ आणि पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश घोष यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये