महाराष्ट्र

पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता


मुंबई : राज्यात आज दिवसभर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून पुढील काही तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात परतीचा पाऊस सक्रिय झाला आहे. शनिवारी राज्यात सर्वदूर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला आहे.

आज रविवारी देखील पुढील काही तासात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून नागरिकांनी काम असल्यासच घराबाहेर पडावे असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आल आहे. हवामान खात्याचे उपसंचालक के एस होसाळीकर यांच्या माहितीनुसार पुढील काही दिवस मुसळधार पावसामुळे धोक्याचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील चार ते पाच दिवस
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, गोवा यासह कोकणात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मच्छिमारांनी किनारपट्टीवर मच्छीमारीसाठी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांनीही खबरदारी घ्यावी असे सांगण्यात आले आहे.

Screenshot 2020 10 11 11 02 04 84 1
Screenshot 2020 10 11 11 07 57 41 1

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये