चक्क रात्रीच्या अंधारात चंद्रकांत पाटील यांची चांदणी चौकातील कामांची पाहणी पाहा व्हिडिओ…

चंद्रकांतदादा आणि अजितदादांच्या स्पर्धेत अधिकारी त्रासणार
पुणे : पुण्याचे पालकमंत्रीआणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी लवकर पाहणी करण्यासाठी, अधिकाऱ्यांना बोलावून घेण्यासाठी फेमस असताना आता कोथरूडचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रात्री दहा वाजता अधिकाऱ्यांना बोलावून चांदणी चौकातील उपाययोजनांची माहिती घेऊन अधिकाऱ्यांनी आता सकाळी लवकर आणि रात्री उशिरापर्यंत कार्यरत असले पाहिजे. असाच मेसेज अधिकारी वर्गाला तर दिला नाही ना ?
पुण्यात सध्या महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. फेब्रुवारी २०२२ ला होणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमूख पक्षामध्येच ही निवडणूक होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकही संधी सोडण्यास तयार नाही. त्यामुळे सकाळी लवकर कामांची पाहणी करणाऱ्या अजिदादांना आता रात्री पाहणी करून चंद्रकांतदादांनी आव्हान दिले आहे.
मात्र या दोन्ही दादांच्या स्पर्धेमध्ये बिचाऱ्या अधिकारी वर्गाला त्रास होणार आहे. चंद्रकांत पाटील यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ मिळत नसल्याने आज त्यांनी चक्क रात्री दहा वाजता चांदणी चौकातील कामांची पाहणी करून आपण कोथरूडकरांसाठी किती तत्पर आहे. हे दाखवून दिले आहे.




