पुणे शहर

पुणेकरांची दिवाळी : पुढील 10 दिवस वाहतूक पोलिसांच्या दंडापासून मुक्तता चंद्रकांत पाटील यांची घोषणा

पुणे : दिवाळीच्या काळात पुण्यातील अनेत रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागतो. पुढील 10 दिवस पुणेकरांकडून कोणताही दंड आकारण्यात येणार नसल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी केली आहे. त्यामुळे पुढील 10 दिवस पुणेकरांची दंडापासून सुटका होणार आहे.

मागील काही दिवस झाले पुण्यात दिवाळीच्या खरेदीच्या निमित्ताने प्रचंड प्रमाणात गर्दी होत आहे. मध्यवर्ती परिसरात वाहनांच्या रांगाच रांगा बघायला मिळत होत्या. त्यामुळे अनेक पुणेकर वाहतुकीचे नियम तोडून मार्ग काढत होते. पोलिसांनाही या गर्दीवर नियंत्रण ठेवणं आणि कारवाई करणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे 10 दिवस कोणताही दंड आकारण्यात येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

Fb img 1647413711531

पुण्यात दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रचंड प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे पुणेकरांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली. त्यामुळे पुणे शहरात प्रत्येक परिसरात वाहतूक कोंडी होते. खड्ड्यांमुळे वाहनाची गती कमी होत असल्याने अपघात होतात. त्यामुळे वेगळी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे सुरुवातील शहरातील रस्ते नीट करण्याचं नियोजन आहे. त्यासाठी शहरातील 400 किलोमीटरचे रस्ते दुरुस्त करण्यासाठीच्या आराखड्याला मंजुरी दिल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. सरकार आल्यानंतरच्या जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रस्ते येत्या काळात चांगले होऊन वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे.

Img 20221012 192956 045

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये