कोथरुड

कोथरूडमध्ये श्री शिवराय वासंतिक उन्हाळी शिबीरात विविध कला व खेळांचा मुलांनी घेतला आनंद

कोथरूड : उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये लहान मुलांमधील विविध कलागुणांना वाव मिळावा, त्यांना विविध खेळ खेळता यावेत, त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढावा यासाठी
पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्या वतीने श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान (ट्रस्ट) व बाल विकास केंद्र, नॉर्थ डहाणूकर कॉलनी यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या श्री शिवराय वासंतिक उन्हाळी शिबीरात  कोथरूड परिसरातील ३ ते १५ वर्षाच्या वयोगटातील असंख्य मुला मुलींनी सहभाग घेतला. दिनांक २० मे ते ३१ मे या कालावधीमध्ये हे शिबिर पार पडले.

या शिबिरात सहभागी मुला-मुलींना नृत्य प्रशिक्षण,
हस्तकला, मातीकाम, चित्रकला, संगीत, गायन, जादूचे प्रयोग, ॲक्टींग यांचे प्रशिक्षण देण्यात आले. या
शिबीराचे आयोजन नॉर्थ डहाणूकर कॉलनीच्या मैदानावर करण्यात आले होते. शिबिरा दरम्यान रोज मुलांना खाऊ ही देण्यात येत होता. समारोपाच्या दिवशी मुलांबरोबर पालकांना आईस्क्रिम पार्टी देण्यात आली.

समारोपाच्या कार्यक्रमात शिबिराच्या काळात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामधील ५० वेजेत्या विद्यार्थ्यांना
शिवसेना गटनेते, नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.

Img 20230601 wa0019

यावेळी बोलताना पृथ्वीराज सुतार म्हणाले, लहान मुलांची
मानसिक व शारिरिक वाढ व्हावी, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, मुलांच्या कला-गुणांना वाव मिळावा या हेतूने या
शिबिराचे आयोजन दरवर्षी करण्यात येत असते. हे शिबिराचे १८ वे वर्ष असून, दरवर्षी साधारण साडेतीनशे ते
चारशे मुले-मुली यामध्ये सहभागी होत असतात.

Img 20220425 wa0010282295345156635031542582

यावेळी कार्यक्रमास नॉर्थ डहाणूकर कॉलनी फेडरेशनच्या अध्यक्षा डॉ. दिपाली पाठक, सेक्रेटरी राहुल यादव, सभासद यशवंत बुचके, बालविकास केंद्राच्या संचालिका अपर्णा वेर्णेकर, स्मिता वाळिंबे, राजेश्वरी यादव उपस्थित होते.
श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष सुधीर वघरडे उपस्थित होते.

या शिबीरामुळे मुलांना नवीन मित्र मिळाले, त्यांच्या आवडीने खेळ खेळता आले. त्यांच्या कला गुणांना वाव मिळाला, मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास या शिबिराची मदत झाली. त्यामुळे यापुढे ही कोथरूडच्या विविध भागात या संस्कार शिबिराचे आयोजन करावे अशी मागणी सर्व पालकांनी यावेळी केली.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चंद्रकांत बोहुडे, नचिकेत घुमटकर, विशाल उभे, जितेंद्र खुंटे, योगेश चौधरी, चेतन डेरे, योगेश क्षीरसागर, सुंदर खुंडे, प्रशांत पाटील, अभिजीत चव्हाण यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुनंदा डेरे यांनी केले तर आभार राजेश्वरी यादव यांनी मानले.

Img 20230511 wa00027384472977045778543

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये