महाराष्ट्र

रघुनाथ कुचिक प्रकरण : ‘सुसाईड नोट लिहिण्यास चित्रा वाघ यांनी भाग पाडले’; पीडितेचा आरोप

पुणे : शिवसेना नेते कुचिक यांच्यावरती बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडित तरुणीने.एक गौप्यस्फोट केला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीच आपल्याला फुस लावल्याचं तिने म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला नाट्यमयरित्या वेगळं वळण लागलं आहे. या प्रकरणात शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्ह्याची नोंद आहे. आता चित्रा वाघ यांच्या सांगण्यावरून आपण रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात तक्रार दिली असल्याचं तिने म्हटलं आहे.

चित्रा वाघ यांच्या सांगण्यावरूनच आपण हे सगळं केलं असल्याचं पीडिता म्हणत आहे. शिवाय मला सुसाईड नोट लिहिण्यास देखील चित्रा वाघ यांनी भाग पाडले असल्याचा गंभीर आरोप देखील पीडित मुलीने केला आहे. शिवाय, खोटे मेसेजही वाचून दाखवले असून हे मेसेज मी पाठवले नाहीत किंवा कुचिकनेही पाठवले नाहीत, त्यामुळे मी या सर्वांबाबत पोलिसांना सांगणार असल्याचेही आताा पीडिता म्हणत आहे.
गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीने मला डांबून ठेवले गेले. पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला चित्रा वाघ यांनी मला भाग पाडले. भाजपच्या एका व्यक्तीने एक पत्र आणून दिले. जे पोलिसांना देण्याची जबरदस्ती माझ्यावर केली जात आहे. हे सर्व आरोप पीडित तरुणींने केले आहेत.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देखील एका व्हिडिओद्वारे शेवटी दूध का दूध पाणी का पाणी झालंच, असं सागंत या प्रकरणावर विशेष टिप्पणी केली आहे. तसेच, आपण पीडितेची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. चित्रा वाघ यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की,.रघुनाथ कुचिक प्रकरण पिडीतेने माझ्यावर केलेले आरोप आताचं ऐकले….खरं तर वाईट वाटलयं पण हरकत नाही असे ही अनुभव येतात. Feb पासून एकटी लढणार्या या पिडीतेसोबत उभे राहीले तेव्हा कुणी तिच्या मदतीला नव्हतं आज मात्र माझ्या विरोधात तिने बोलताचं सगळे एकत्र तिच्या मदतीसाठी आलेत याचा आनंद वाटला…मी सगळ्या चौकशींसाठी तयार आहे…मला राज्यातल्या मायमाऊलींना सांगायचंय काही अडचण असेल संपर्क करा जी मदत आम्हाला करता येईल ती आम्ही नक्की करू व करत राहू ….

Img 20220412 wa0230
Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये