कोथरुड

लाचखोर अधिकारी सचिन तामखेडेच्या घरी सापडली साडेनऊ लाखाची कॅश

पुणे : ड्रेनेज लाईनच्या कामाच्या बिलाच्या मंजुरीसाठी ठेकेदाराकडून 15 हजाराची लाच घेणाऱ्या सहाय्यक आयुक्त सचिन चंद्रकांत तामखेडेच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला साडेनऊ लाखाची रोकड सापडली आहे. ही रोकड कोठून आली याचा तपशील देऊ न शकल्याने ती जप्त करण्यात आली आहे. तामखेडेबरोबरच कनिष्ठ अभियंता अनंत रामाभाऊ ठोक (वय 52) आणि शिपाई दत्तात्रय मुरलीधर किंडरे यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

तक्रारदाराला कोथरूड भागात ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम मिळाले होते. या कामाचे बिल त्याने कोथरूड क्षेत्रीय कार्यालयात सादर केले होते. या बिलाला मंजुरी मिळावी यासाठी त्यांनी सहाय्यक आयुक्त तामखेडे यांची भेट घेतली. तेव्हा त्यांना 25 हजाराची लाच मागण्यात आली. ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तडजोड करत तामखेडे यांनी 15 हजाराची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. तामखेडेने कनिष्ठ अभियंता ठोक यांच्याकडे रक्कम देण्यास सांगितले. ठोक याने किंडरेकडे रक्कम देण्यास सांगितले. तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारताना किंडरे व दोघांना पकडण्यात आले.

Fb img 1648963058213
Img 20220412 wa0230

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये