महाराष्ट्र

सदाबहार सिने अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन..

मुंबई : चित्रपट सृष्टीतील सदाबहार सिने अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

वैविध्यपूर्ण भूमिका साकारून त्यांनी मराठी रसिकांची मने जिंकली होती. त्यांचे मोरोची मावशी या नाटकाने रसिकांच्या मनामध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रदीप पटवर्धन यांनी एक फुल चार हाफ, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, बॉम्बे वेलवेट, पोलीस लाईन, एक शोध, थँक्यू विठ्ठला, नवरा माझा नवसाचा अशा अनेक सिनेमांमधून काम केले आहे.

पहाटे मुंबईतील ठाकूरद्वार येथील राहत्या घरी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपट सृष्टीची मोठी हानी झाली असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Fb img 1647413711531

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये