पुणे शहर

भाजपा सहकार आघाडीने सुरू केलेल्या मोफत कायदेशीर सल्ला केंद्रात नागरिकांना मिळाले तज्ञांकडून मार्गदर्शन

पुणे : भारतीय जनता पार्टी सहकार आघाडी पुणे शहर वतीने पुणेकरांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या  मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन केंद्राकडे नागरिक आपल्या समस्या व अडचणी घेऊन येऊ लागले आहेत. शनिवारी पहिल्याच दिवशी विविध प्रश्नाबाबत नागरिकांनी तज्ञांकडून मार्गदर्शन घेतले. Citizens get expert guidance at the free legal advice center started by the BJP Co-operative Front

भाजपा पुणे शहर कार्यालय , सन्मान हॅाटेल , पुणे येथे मोफत सल्ला केंद्रामार्फे पहिल्याच दिवशी ३ सोसायट्या डीम्ड कन्व्हेअन्स , अतिक्रमणे  , ३ खाजगी मालमत्ता , कौटुंबिक , आणि बिल्डर्स यांचे विषयी तक्रारींवर  कायदेतज्ञांनी नागरिकांना मार्गदर्शन केले .

Img 20210116 wa0007

सहकार आघाडीच्या वतीने दिलेल्या लिंक वर एक आठवड्यात २० तक्रारी आल्या होत्या . अनेक कागदपत्रांसह आलेल्या विविध सोसायटी पदाधिकारी , वैयक्तिक अडचणींसाठी आलेल्या मंडळींनी मिळालेल्या सल्ल्याबाबत यावेळी समाधान व्यक्त केल्याचे भाजप सहकार आघाडीचे पुणे शहराध्यक्ष सचिन दांगट यांनी सांगितले.

याप्रसंगी ॲड.अभय सोमण , अध्यक्ष सचिन दशरथ दांगट , उपाध्यक्ष किशोर चौधरी , सरचिटणीस अजित देशपांडे , चिटणीस नंदकुमार बोळे , किरण उभे आदि उपस्थित होते.

Whatsapp image 2021 02 16 at 7. 54. 33 pm

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये