विकासासाठी कर्वेनगर मधील नागरिक भाजप उमेदवारांच्या पाठीशी – भाजप उमेदवार राजाभाऊ बराटे

कर्वेनगर भागामध्ये भाजप उमेदवारांच्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : विकासासाठी कर्वेनगर मधील नागरिक भाजप उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. गेल्या काही वर्षांत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कर्वेनगर तसेच पूर्ण पुणे शहरात अनेक विकासाची कामे सूरु आहेत. त्यामूळे नागरीकांना आमच्यावर विश्वास आहे असे मत भाजप उमेदवार राजाभाऊ बराटे यांनी व्यक्त केले.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्वेनगर भागात भाजप उमेदवारांनी आयोजित केलेल्या प्रचार पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि जल्लोषपूर्ण प्रतिसाद मिळाला. यावेळी बराटे बोलत होते.

राजाभाऊ बराटे म्हणाले, “कर्वेनगरचा विकास हाच माझा मुख्य अजेंडा आहे. गेल्या काही वर्षांत भाजपच्या नेतृत्वाखाली पुण्यात झालेल्या विकासकामांचा पाठपुरावा करून येथे नवीन प्रकल्प राबवले जातील. नागरिकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, विजय निश्चित आहे.”भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कर्वेनगर प्रभागात भाजपची मजबूत स्थिती असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पदयात्रेदरम्यान नागरिकांनी “विकासासाठी भाजप उमेदवारांच्या पाठीशी” अशा घोषणा देत उमेदवारांचे स्वागत केले. कर्वेनगर भागातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांच्या विकासासाठी भाजपची भूमिका स्पष्ट असल्याचे नागरिकांनी सांगितले.
कर्वेनगरमधील विविध सोसायट्या आणि रस्त्यांवरून काढण्यात आलेल्या या पदयात्रेत शेकडो नागरिक सहभागी झाले होते.विकासाच्या मुद्द्यांवर भाजप उमेदवार राजाभाऊ बराटे, सुशील मेंगडे, तेजश्री पवळे, रेश्मा बराटे यांना पाठिंबा देण्याची भावना व्यक्त केली.



