पुणे शहर

बाटल्या आणि रॅपर्स डब्यात किंवा रस्त्यावर फेकू नका – “स्वच्छ एटीएम मशीन” वापरा आणि मोबदला मिळवा!

पुणे : बाटल्या आणि रॅपर्सची विल्हेवाट लावण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने आता स्वच्छ ATM चा वापर केला जाणार आहे. या स्वच्छ ATM चा वापर केल्यास नागरीकांना मोबदला देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

महापालिकेच्या या अनोख्या उपक्रमामुळे बाटल्या आणि रॅपर्स अशा कचऱ्याची विल्हेवाट लावणे सोपे जाणार आहे. बाटल्या आणि रॅपर्सची विल्हेवाट लावण्यासाठी स्वच्छ ATM मशीन वापरा आणि मोबदला मिळावा अशी टॅग लाईन पुणे महापालिकेने केली आहे.

स्वच्छ ATM मशीन कसे वापरायचे स्वच्छ एटीएमच्या मशीन मध्ये नागरिकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाद्वारे रजिस्ट्रेशन करावयाचे आहे.त्यानंतर कचऱ्याचा प्रकार निवडायचा आहे जसे की प्लास्टिकची बाटली काचेची बाटली धातूचे केन्स किंवा प्लास्टिक रॅपर्स हा कचरा सदर मशीन मध्ये टाकल्यानंतर खालील प्रमाणे पैसे संबंधित नागरिकांच्या खात्यात जमा होणार आहे

प्लास्टिकच्या बाटलीसाठी रू १ प्रती बॉटल
काचेच्या बाटलीसाठी रू ३ प्रती बॉटल
धातूच्या कॅन्स साठी रू २ प्रती कॅन
प्लास्टिक रॅपर्स रू ०.२० प्रती रॅपर्स
असे पैसे देण्यात येणार आहेत.

हे स्वच्छ एटीएम किती ठिकाणी बसवण्यात येणार आहेत याबाबत लवकरच माहिती जारी करण्यात येणार आहे.

Img 20211014 wa0004

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये