महाराष्ट्र

नवी मुंबईत मराठी भाषा भवन : शिक्षणमंत्री दीपक केसरकर

पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : राज्यातील साहित्यिक मुंबईत आल्यानंतर त्यांना राहण्याची अडचण निर्माण होते. ही अडचण दूर करण्यासाठी नवी मुंबईत ‌‘मराठी भाषा भवन’ उभारण्यात येणार आहे, असे भाषा-शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

Img 20240202 wa00048471904785770913928


अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेरद्वारा आयोजित 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी शाळेत दररोज एक तास वाचनावर भर दिला आहे. मराठी भाषा धोरण महिनाभरात जाहीर करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Img 20240202 wa00034606059587729487622


आपल्याकडे मराठी शाळा बंद पडत असताना जगभरातील पालक त्या-त्या ठिकाणच्या मराठी शाळांमध्ये पालक आपल्या मुलांना दररोज एक तास पाठवतात. महाराष्ट्राबाहेरही बृहन्महाराष्ट्रातील मराठी साहित्य संमेलनांना 25 लाख रुपये निधी देण्याचा शासनाचा निर्णय झाला आहे. मुलांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी यासाठी मराठी युवक मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक मंडळाला पाच हजार रुपये अनुदानही देण्यात येईल. मराठी भाषेच्या विकासासाठी आपल्या काही अपेक्षा असतील तर त्या कळवा, असेही मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.

Img 20240202 wa00029218339254755901166

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये