कोथरुड

कोथरुडमध्ये शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ३५० जणांचे रक्तदान..

माजी सभागृह नेते शंकर केमसे यांच्या वतीने आयोजन

कोथरुड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, पद्मविभूषण शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोथरुड मध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ३५० जणांनी रक्तदान करत समाजासाठी महान कर्तव्य बजावले. माजी सभागृह नेते शंकर केमसे यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
 

यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास मांसाहारी असेल तर दोन किलो चिकन व शाकाहारी असल्यास अर्धा किलो पनीर भेट देण्यात आले. रक्तदान केलेल्या व्यक्तीस प्रोटीनयुक्त आहार देण्याचा नवीन पायंडा शंकर केमसे यांनी सुरू केला आहे.

कोथरुड डेपो भुसारी कॉलनी मधील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावरील सभागृहात हे शिबिर पार पडले. यावेळी नेत्र चिकित्सा शिबिराचे ही आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात महिलांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत रक्तदान केले. सध्या कोरोना परिस्थितीमुळे शहरात रक्ताचा तुटवडा वारंवार निर्माण होत आहे, त्यामुळे नागरिकांनी रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान करावे यासाठी मी केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे केमसे यांनी सांगितले.

Whatsapp image 2021 11 23 at 2. 46. 54 pm
Img 20211129 wa0128

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये