पुणे शहर

पेट्रोल दरवाढीची सेंचुरी ; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अभिनव पद्धतीने निषेध…

पुणे : कोरोना काळात लॉकडाऊन आणि कडक निर्बंध असताना राज्यातील जनता मेटाकुटीला आली आहे. यातच होत असलेली पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलन केले.(Century of petrol price hikes; NCP Youth Congress protests in an innovative way)

सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस गिरीश गुरनानी यांच्या नेतृत्वाखाली कोथरूड करिष्मा चौकातील कासट पेट्रोल पंप येथे केले गेले.यावेळी रवी गाडे, ऋषिकेश कडु, निलेश बच्चेवार, राजेश बच्चेवार, कृष्णा पुजारी, संकेत शिंदे, राहुल जमदाडे, प्रकाश नागरे, अमोल गायकवाड, धनंजय शेळके, संदीप बांदल आदी उपस्थित होते.

Img 20210430 wa0001

‘राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. आर्थिक आवक मंदावली असताना पेट्रोल दरवाढीचे चटके देखील सोसावे लागत आहे. राज्यातील पेट्रोल दरवाढीच्या सेन्चुरीने होरपळलेल्या जनतेकडे मोदी सरकारचे लक्ष आहे का ? सर्व सामान्य जनतेला ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखवत आर्थिक संकटात लोटणाऱ्या सरकारचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस गिरीश गुरनानी यांच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला.

‘बहोत हो गयी महेंगाई की मार, बस्स करो मोदी सरकार’, ‘वाह रे मोदी तेरा खेल, सोने के दाम मी बिकता तेल’ अशा घोषणांनी निषेध व्यक्त केला.

महामारीच्या काळात ही दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे. तसेच पेट्रोलच्या किंमती वाढल्याने भाजीपाल्यांच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे. ही जनतेची चाललेली क्रूर चेष्टा थांबवावी म्हणून हे आंदोलन करण्यात आले , अशी माहिती गिरीश गुरनानी यांनी दिली.

Screenshot 2021 05 12 21 44 03 43 1
Fb img 1620720024574

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये