महाराष्ट्र

बारावी नापास नवनीत राणा यांचे गणित कच्चे : काँग्रेसचे टीकास्त्र

नागपूर : बारावी नापास खासदार नवनीत राणा यांचे गणित सुरुवातीपासूनच कच्चे असल्याने त्यांना मोर्चात सहभागी असलेल्यांची योग्य ती शिरगणती करता आली नाही, असा टोला प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी लगावला आहे.

महामानवांच्या अवमानाच्या विरुद्ध शनिवारी मुंबईत निघालेल्या महाविकास आघाडीच्या मोर्चाला दोन लाखांपेक्षा जास्त गर्दी असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीच्या या मोर्चात अवघे तीन हजार लोक सहभागी झाले होते असे बालिश विधान केले होते, याकडे लक्ष वेधत एडतकर यांनी राणा यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मेहरबानीने निवडून आलेल्या अपक्ष खासदारांने हास्यास्पद विधान करून आपला बालिशपणाच जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले.

टूकार चित्रपटात भगवे वस्त्र धारण करून नाच

खासदार नवनीत राणा या नेहमीच दुटप्पी आणि दुतोंडी भूमिका घेत आल्या आहेत. चित्रपटात भगवा धारण करण्यावरून नवनीत राणा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. परंतु, याच नवनीत राणा यांनी, त्यांच्या टुकार चित्रपटात यापूर्वी भगवे वस्त्र धारण करून बेभान नाच केला आहे हे त्या सोईस्कर विसरतात. त्यामुळे वेळोवेळी सोयीनुसार आपल्या भूमिका बदलणाऱ्या खासदारांनी आपण यापूर्वी काय बोललो आणि कसे वागलो ? याचा मागोवा घेऊन बोलावे अशी टीका करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा अवमान करणारी वक्तव्य भाजपच्या नेत्यांनी केली, तेव्हा मात्र खासदार बाईंची तोंड उघडले नव्हते याकडेही दिलीप एडतकर यांनी लक्ष वेधले आहे.

Img 20221126 wa02126927299965323449855

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये