कोथरुड
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त कोथरुड मध्ये कोरोना योद्ध्यांचा सन्मान..

कोथरुड : राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक १० कोथरुड बावधनचे अध्यक्ष राजेंद्र उभे यांच्या वाढदिवसानिमित्त व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून कोथरुड बावधन मधील कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. Corona Warriors honored in Kothrud on the occasion of NCP’s anniversary.
यावेळी माजी सभागृह नेते शंकर केमसे, खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष काका चव्हाण,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विजय डाकले, राष्ट्रवादी युवक काँग्रेस खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष कुणाल वेडे पाटील, राजा गोरडे, दामोदर कुंबरे, किर्ती पानसरे, अंकुश उभे आदी उपस्थित होते. या प्रसंगी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत 50 झाडांचे उपस्थतीत नागरिकांमध्ये वाटप करण्यात आले.




