पुणे शहर

लसीकरणाचे काम प्रामाणिकपणे करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा नगरसेवक दीपक मानकर यांच्याकडून सन्मान..

कोथरुड : pune city, Kothrud प्रभाग क्रमांक ११ मधील महापालिकेच्या राऊत दवाखान्यात अविरतपणे लसीकरणाचे काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा नगरसेवक दीपक मानकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे कोथरुड मतदार संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांच्यावतीने सन्मान करण्यात आला. आतापर्यंत राऊत दवाखान्यांमध्ये  १५०३६ नागरिकांच्या लसीकरण करण्यात आले आहे.

माझा प्रभाग माझी जबाबदारी अंतर्गत गेली दोन वर्ष प्रभाग क्रमांक 11 मध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचे काम सुरू असून लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून प्रभागातील प्रत्येक नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी नगरसेवक दीपक मानकर व हर्षवर्धन मानकर यांचेकडून प्रयत्न सुरू आहेत.

Img 20211108 wa0149

प्रभागातील राऊतवाडी केळेवाडी, हनुमाननगर, मोरे श्रमिक वसाहत, मेगा सिटी वसाहत, गिरिजा सोसायटी, कानिफनाथ सोसायटी, स्नेह पॅराडाईज, जीवन छाया सोसायटी, भारती विद्यापीठ कॅम्पस, एम आय टी कॅम्पस, वसंतनगर येथील बहुसंख्य नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून  मेडिकल कर्मचारी व डॉक्टर लसीकरणाचे काम अत्यंत प्रामाणिकपणे काम करीत आहेत. त्यांच्या या कामाचे कैतुक करून त्यांचा आज सन्मान करण्यात आला. 

हर्षवर्धन मानकर म्हणाले, कोरोना चा प्रादुर्भाव वाढलेला असताना व आता लसीकरण मोहीम सुरू असताना आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. त्यांनी प्रत्येक वेळेस न घाबरता आपले कर्तव्य पार पाडले आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांच्यामुळेच या संकटातून आपण बाहेर पडत आहोत.

यावेळी डॉक्टर अंजली टिळेकर, वाॅर्ड मेडिकल ऑफिसर डॉक्टर नाग मॅडम, दिलीप कानडे, अश्विनी नाईक, पूनम चव्हाण, अनुराग कांबळे, अमोल पवार,अरुण भगत, अमोल गोडांबे, अरुण भिलारे, सुदाम मारणे, विशाल देशमुख, सोनाली चौधरी, रोहन कोंढरे यांचा या ठिकाणी सन्मान  करण्यात आला.  यावेळी  मैत्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष जावेद शेख, माजी अध्यक्ष लिंबाजी दिघे, भूषण आण्णा शिर्के, नितीन निवंगुणे,  संजय भगत, शंकर जावळे,  सुरज तुरुकमारे, निखील गोणते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वडवेराव यांनी केले

Img 20211105 wa0169
Img 20211108 wa0011
Img 20211108 wa0067 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये