‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत कायदेविषयक प्रदर्शनाचे आयोजन

मुंबई : मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने ‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत, कायद्याचा इतिहास, कायदेविषयक माहिती, आणि प्राप्ती यासंबंधीचे प्रदर्शन मुंबई उच्च न्यायालय म्युझियम रुम नंबर १७, तळ मजला मुख्य इमारत येथे आयोजित करण्यात आले आहे. Azadi Ka Amrit Mahotsav
या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्य न्यायमूर्ती दिपंकर दत्ता यांच्या हस्ते करण्यात आले. दिनांक १४ नोव्हेंबर २०२१ पर्यंत कार्यालयीन वेळेत हे प्रदर्शन सुरू राहणार असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी उच्च न्यायालयाचे इतर न्यायमूर्ती व न्यायालयीन अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते. कायद्याचा इतिहास, कायदेविषयक माहिती, आणि प्राप्ती यावर आधारित हे प्रदर्शन आहे.










