पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन बँक निवडणूकीत श्री स्वामी समर्थ पॅनेलला छत्री चिन्ह

पुणे : म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्व्हंट्स को- ऑप. अर्बन बँक लि. पुणे या बँकेची निवडणूक जाहीर झाली असून येत्या 20 नोव्हेंबर रोजी हि निवडणूक पार पडणार आहे. आज निवडणुक अधिकाऱ्यांनी बँकेच्या निवडणुकीत सहभागी असणाऱ्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले. श्री स्वामी समर्थ पॅनेलला छत्री चिन्ह देण्यात आले आहे.
श्री स्वामी समर्थ पॅनेलचे उमेदवार पुढीलप्रमाणे :
सर्वसाधारण गट- विठ्ठल नामदेव जगदाळे, बाळकृष्ण दत्तात्रय उंदरे, अजय लक्ष्मण गोळे, शेखर संभाजी सावंत, हनुमंत रघुनाथ खेडेकर, सुनील सदाशिव पोमण, अंकुश लक्ष्मण कदम, राजेंद्र धोंडिबा कोंडे,
महिला राखीव गट- तनुजा रुपेश रावळ, सुवर्णा अनिल हारपुडे ,
अनुसूचित जाती जमाती गट- सुनिल दत्तात्रय कांबळे, इतर मागासवर्ग- गजानन उर्फ किरण लक्ष्मण खोंड,
विमुक्त जाती भटक्या जमाती- रामदास भुजंगराव गायकवाड
स्वामी समर्थ पॅनेलचे प्रमुख व माजी उपमहापौर दीपक मानकर म्हणाले, इथून पुढे सभासदांना आर्थिक झळ बसणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. या छत्रीच्या माध्यमातून बँकेच्या सर्व सभासदांना मायेची सावली देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत.
आता आपल्या बँकेच्या संचालक मंडळांची पंचवार्षिक निवडणुक होत आहे, यासाठी सभासदांच्या सेवेसाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करणारे तसेच बँकेच्या हितासाठी सदैव झटणारे, पुणे मनपा, पी.एम.पी.एम.एल. व शिक्षण मंडळ या तीनही विभागातील क्रियाशील कामगार सभासद एकत्र येऊन श्री स्वामी समर्थ पॅनेलच्या वतीने निवडणुक लढवीत आहेत.
आमच्या पॅनेलच्या सर्व उमेदवारांना छत्री हे अधिकृत चिन्ह निवडणुक अधिकाऱ्यांनी दिले आहे. गेल्या पंच वार्षिक मध्ये आमच्या पॅनेलच्या सर्व संचालकांनी केलेल्या चांगल्या कामाच्या आधारे तसेच बँकेमध्ये नविन सुधारणा घडविण्यासाठी आमच्या पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मतदान करावे असे आवाहन मानकर यांनी केले आहे.







