पुणे शहर

नगरसेवक किरण दगडे पाटील मित्र परिवार आयोजित दहीहंडी उत्सव सोमवार २६ ऑगस्ट रोजी होणार साजरा

बावधन : पुणेकरांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू असणारा नगरसेवक किरण दगडे पाटील मित्र परिवार आयोजित दहीहंडी उत्सव सोमवार दिनांक २६ ऑगस्ट २०२४ रोजी बावधन येथील तलाठी कार्यालयासमोरील मैदानावर आयोजित करण्यात आला असून उत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती आयोजक किरण दगडे पाटील यांनी दिली.

नगरसेवक किरण दगडे पाटील यांची दहीहंडी तरुण तरुणी व परिसरातील नागरिकांसाठी कायमच आकर्षणाचा कंद्रबिंदू राहिली आहे, त्यामुळे दरवर्षी ही दहीहंडी गर्दीचे रेकॉर्ड ब्रेक करत चालली आहे. बावधन बु. येथील तलाठी कार्यालयाच्या समोरील मैदानात मोठ्या जल्लोषात दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येत असतो. हे पूर्ण मैदान गोपाळ भक्तांनी भरून गेलेले असते. 

Img 20240825 wa00083165119374082998524

शहरात २७ ऑगस्टला दहीहंडी उत्सव साजरा होणार असला तरी बावधन मधील किरण दगडे पाटील मित्र परिवार आयोजित दहीहंडी उत्सव हा जन्माष्टमी दिवशी म्हणजे सोमवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी साजरा होणार असून अमृता देवेंद्र फडणवीस व हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई मांजरेकर व मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री भार्गवी चिरमुले या उत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय नागरी हवाई उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील, राजसभा खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर हे राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Fb img 16474137115315333568191096823716
Screenshot 2024 08 20 16 33 27 551301213897430355510
Img 20240404 wa00123413096165072096535
Img 20240404 wa00134916733315783821383

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये