पुणे महानगरपालिका निवडणूकीत अजितदादांनी पुणेकरांना दिलेल्या वचनांची पूर्तता महापौरांनी करावी हिच दादांना श्रद्धांजली- नगरसेवक अमोल बालवडकर

बाणेर बालेवाडी प्रभागातील मधील पाच वर्षांपासून पडून असलेले रुग्णालय तातडीने सुरू करावे – नगरसेवक अमोल बालवडकर
पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना दिलेल्या विविध विकासाच्या वचनांची पूर्तता करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, बाणेर बालेवाडी मधील गेल्या पाच वर्षांपासून पडून असलेले रुग्णालय तातडीने सुरू करावे.असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी व्यक्त केले आहे.
अमोल बालवडकर यांनी महापौर निवडणुकीसाठी आयोजित पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हे मत व्यक्त केले आहे. अमोल बालवडकर म्हणाले, अजित पवार यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पुण्यातील रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, ट्रॅफिक जाम, पूररेषा आणि प्रदूषणासारख्या मुद्द्यांवर वचने दिली होती. आता महापौर मंजुषा नागपुरे यांनी या वचनांची अंमलबजावणी करावी, जेणेकरून पुणेकरांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल.

अमोल बालवडकर हे प्रभाग क्रमांक ९ (बाणेर-बालेवाडी-पाषाण) मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवून विजयी झाले आहेत. भाजपने शेवटच्या क्षणी त्यांचे तिकीट कापल्याने ते अजित पवार यांच्या पक्षात दाखल झाले होते. अजित पवार यांनी स्वतः प्रचार सभेत बालवडकर यांच्या पाठीशी उभे राहून पुणे महापालिकेच्या कारभारावर टीका केली होती आणि विकासाच्या मुद्द्यांवर भर दिला होता.
अमोल बालवडकर म्हणाले,अजितदादांच्या या वचनांची पूर्तता महापौर मंजुषा नागपुरे यांनी करणे हे अजित पवार यांच्यासाठी सर्वोत्तम श्रद्धांजली ठरेल. पुणेकरांच्या समस्या सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, असे त्यांनी आवाहन केले आहे.



