पुणे शहर
आमदार शिरोळे यांच्यावतीने जनवाडीत अन्नधान्य कीटचे वाटप,पावसाचा तडाखा बसलेल्या भागाची केली पाहणी
पुणे : जोरदार पावसामुळे शनिवारी रात्री जनवाडी भागातील अनेकांच्या घरात पाणी शिरून अतोनात नुकसान झाले. अशा नुकसानग्रस्त रहिवाशांना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यावतीने अन्नधान्याचे कीट आज (सोमवारी) देण्यात आले.
पाऊस आणि साचलेल्या पाण्यामुळे जनवाडीत ज्या भागाचे नुकसान झाले, तेथील नुकसानीची प्रत्यक्ष पहाणी आमदार शिरोळे यांनी केली आणि नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. तसेच महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून समस्या सोडविण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांना दिल्या. रहिवाशांना थोडा दिलासा मिळावा, यासाठी त्यांना आमदार शिरोळे यांनी अन्नधान्याचे कीट दिले. या पाहणी वेळी किरण ओरसे, लक्ष्मण नलावडे, सुरेश शिंदे, रमेश भंडारी तसेच स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.