महाराष्ट्र

माजी आरोग्यमंत्री दीपक सावंतांच्या गाडीला अपघात; डंपरने दिली धडक

मुंबई/ठाणे : घोडबंदर येथून पालघरच्या दिशेने प्रवास करत असताना माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. डंपरने गाडीला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. डंपर चालकाला काशिमीरा पोलिसांनी ताब्यात घेतले असून सावंत हे स्वतःच रुग्णवाहिकेने मुंबई येथील क्रिटिकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत.

मोखाडा येथे कुपोषित मुलांच्या झालेल्या मृत्यूचा आढावा घेण्यासाठी दीपक सावंत जात होते. दरम्यान सकाळी साडेअकराच्या सुमारास घोडबंदर येथील सगनाई नाका येथे पोहचले असताना त्यांच्या गाडीला एका डंपरने मागून धडक दिली. यात सावंत यांच्या पाठीला दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी काशिमीरा पोलिसांनी धाव घेऊन डंपर चालक इर्शाद शहजाद खान याला ताब्यात घेतले आहे. तर सावंत हे स्वतःच रुग्णावाहिकेने प्रवास करून अंधेरी येथील क्रिटिकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत.

या घटनेतील दोन्ही वाहनांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी दिली आहे.

Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये