सिनेजगत

दिग्दर्शक, अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन

मुंबई : बॉलिवूड अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी आखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. कालच कौशिक यांनी होळी खेळलेले फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंट अपलोड केले होते. त्याच्या अचानक जाण्याने बॉलिवुडला धक्का बसला आहे. हार्ट अटॅक मुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती पुढे आली आहे.

अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन करण्याबरोबरच त्यांनी अभिनेता म्हणूनही आपली कारकीर्द गाजवली. विनोदी व गंभीर भूमिका त्यांनी साकारल्या. आपल्या अभिनय कौशल्याने त्यांनी रसिकांना भुरळ घातली होती. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

मिस्टर इंडिया मध्ये त्यांनी केलेली कॅलेंडर ची भूमिका विशेष गाजली. मासूम, रूप की राणी चोरो का राजा, प्रेम हे चित्रपट दिगदर्शित केले. अनिल कपूर ,काजोल चा हम आपके दिलं मे रहते हैं, सलमान खान, भूमिका चावलाचा तेरे नाम हे त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले. गिरणी कमगारांवर आधारित असलेल्या लालबाग परळ या मराठी चित्रपटतही त्यांनी भूमिका साकारली होती.

मिस्टर इंडिया, दिवाना मस्ताना, जाने भी दो यारो, कागज, कर्ज, जमाई राजा, साजन चले ससुराल, मिस्टर अँड मिसेस
खिलाडी आदी सिनेमातील त्यांच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या.

Img 20221126 wa02126927299965323449855

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये