पुणे शहर

पुण्यातील गणेश उत्सव निर्विघ्न पणे पार पाडण्यात महत्वाची भूमिका बजावलेले पोलीस उपायुक्त संदीप गिल यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे तर्फे सन्मान

पुणे : पुणे शहरातील मानाच्या गणेश उत्सवाच्या दरम्यान अतिशय कर्तव्य दक्ष राहून पुण्याचा गणेश उत्सव दिमाखात आणि निर्विघ्न पणे पार पाडण्यात महत्वाची भूमिका बजावलेले कार्यक्षम आणि धडाकेबाज परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीप गिल यांचा त्यांच्या कार्याबद्दल सन्मान करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

तसेच या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे तर्फे महात्मा फुले मंडई मेट्रो स्थांनकाच्या परिसरात बेकायदेशीर वेश्या व्यवसाय, अमली पदार्थ विक्री आणि अवैध दारू विक्री आणि यांना संगनमताने मदत करणारे लॉज मालक यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि सदर लॉज सिल करण्यात यावे कारण या मुळे महात्मा फुले मंडई परिसर आणि पर्यायाने पुणे शहर बदनाम होत आहे आणि या भागातील महिला व पुरुष नागरिक यांचे जीवनमान धोक्यात आले आहे त्या मुळे लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल या साठी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

Img 20241007 wa0013

या वेळी गिल साहेब यांनी ताबडतोप संबधित अधिकारी यांना बोलावून घेऊन तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.त्यामुळे सध्या आंदोलन तूर्तास काही दिवस करणार नाही परंतु या पुढे कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असे  शिष्ट मंडळाने सांगितले.

Img 20240404 wa0016281291197243699799508498

या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अँड मंदारभाऊ जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, राष्ट्रवादी काँग्रेस चे पुणे शहर उपाध्यक्ष दत्ताभाऊ सागरे, रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशन च्या तसेच मुस्लिम समाज महिला आघाडीच्या अध्यक्ष महजबिन शेख,मुश्ताक,शेख,निलोफर शेख, सुनीता चव्हाण,निखिल साळुंखे यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.

Img 20240404 wa0012281298841886320058264868
Img 20240404 wa0013281291032765212350995267

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये