पुणे शहर

चंद्रकांत पाटील यांना विजयी करण्याचा कवितेतून केला संकल्प

कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील पदयात्रा व  रॅलीच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधत आहेत. या प्रचारफेरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज एका ज्येष्ठ नागरिकाने कवितेच्या माध्यमातून विक्रमी मतांनी पाटील यांना विजयी करण्याचा संकल्प केला.

Img 20241020 wa0001435697684176070576

विधानसभा निवडणूक प्रचार संपण्यास आता काही तासच उरले आहेत. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांची पाच वर्षांतील विकासकामे आणि सेवा उपक्रमांच्या बळावर विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार केला जात असून त्याचा प्रत्यय निवडणूक प्रचारामध्ये सातत्याने येत आहे.

आज चंद्रकांत पाटील यांनी नवचैतन्य हास्य योग परिवाराच्या बाणेर शाखेच्या सराव शिबीरास सदिच्छा भेट दिली. यावेळी हास्य क्लबचे सदस्य दिपक पावसे यांनी कवितेच्या माध्यमातून शुभेच्छा देत; चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी सागर बालवडकर, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाशतात्या बालवडकर, कल्याणी टोकेकर उपस्थित होते.

Img 20240404 wa0016281297658999536660438617
Img 20240404 wa0013281298602993728148316202

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये