मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी; बोरघाटात वाहनांची रांग

पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली आहे. बोरघाटात वाहनांची रांग लागली आहे. दिवाळीसाठी घरी निघालेल्या प्रवासी आणि नागरिकांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. दिवाळीसाठी घरी निघालेल्या प्रवासी आणि नागरिकांना जागोजागी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्याने अनेक जण आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. मात्र, यामुळे ठिकठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुलांच्या परीक्षाही संपल्या आणि दिवाळीची सुट्टी सुरू झाली आहे. या कारणामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवरील बोरघाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.



दिवाळीच्या सुट्टीचा हा परिणाम असून मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या घराकडे निघाल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यावर वाहनांची संख्या वाढल्याने सकाळपासून एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडी आहे. HOC ब्रिज अमृतांजन पुलापर्यंत वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.



नगर, सातारा आणि नाशिक महामार्गावरही वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. सोलापूर-पुणे मार्गावर वाहतूक कोंडी होऊन थेऊरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.



























