पुणे शहर

राजाभाऊ बराटे यांच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तूंचे वाटप..

कर्वेनगर : माजी नगरसेवक राजाभाऊ बराटे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक ३१ मधील साफसफाई कामगारांची दिवाळी भेटवस्तू व मिठाई वाटप करून गोड करण्यात आली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या प्रसंगी ह.भ.प चंद्रकांत महाराज वांजळे, कोथरूड विधानसभा मतदारसंघ भा.ज.पा अध्यक्ष पुनीत जोशी, माजी नगरसेवक शिवराम मेंगडे, किरण दगडे पाटील, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, दत्ता पिसे, अरुण निवगुणें, प्रभाग अध्यक्ष हेमंत बोरकर, स्विकृत नगरसेविका मिताली साळवेकर, चिटणीस विशाल रामदासी, युवा मोर्चा सरचिटणीस रूषिकेश बराटे, कवी रेणुसे आदी उपस्थित होते .

Fb img 1647413711531 1

कार्यक्रमाचे नियोजन कोथरूड विधानसभा मतदारसंघ सरचिटणीस विठ्ठल बराटे यांनी केले होते. यावेळी दिवाळी फराळ कार्यक्रमाला प्रभागातील अडीच ते तीन हजार नागरिकांनी उपस्थित राहत फराळाचा आस्वाद घेतला.

Img 20221012 192956 045 1
Img 20221103 wa00038793484479010203159

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये