पुणे शहर

शिवराज्याभिषेकदिनी विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप;बाणेर येथील पूनम विशाल विधाते यांचा अनोखा उपक्रम

पुणे : प्रजेचा सांभाळ पित्याप्रमाणे करणारे कनवाळू पिता होते, तसेच बंडखोर-फितुरांना देहदंडाची शिक्षा देणारे कर्तव्यकठोर, न्यायनिष्ठुर राजाही होते. शिवछत्रपती हे माणूस होते की नियतीला पडलेले पूर्णत्वाचे स्वप्न होते, कळत नाही. आपण त्यांच्यातील एक तरी गुण अंगीकारावा हीच शिवजयंती साजरी करण्याची सगळ्यात चांगली पद्धत असेल! छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक कलेतून प्रेरणा घेऊन दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याचं औचित्य साधून गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्याचा प्रण करत आहे.ज्या स्वराज्यासाठी महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं त्याच समाजातील सावित्रीच्या लेकींसाठी शालेय साहित्य वाटप करण्याचा प्रण वामा क्लबच्या पूनम विधाते यांनी केला आहे.

बाणेर बालेवाडी येथील महिलांच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या पूनम विशाल विधाते महिलांसाठी मॅरेथॉन चे आयोजन करत महिलांच्या आरोग्यविषयी जनजागृती केली. आज त्या वामा क्लब च्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं कार्य करत आहेत. आज शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं महिलांना शिक्षणाची दारं खुली व्हावीत म्हणून शालेय साहित्याचं वाटप केले.
गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याने त्यांना शिक्षणाच्या समान संधी मिळण्यास मदत होईल. या प्रकल्पामुळे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत जागरुकता येण्यास मदत होईल.

Fb img 17177364062809189252169858838863
Fb img 17176807055063452256632276440792
Img 20240606 wa00116415178194496147748
Img 20240607 wa00106155524562941881055
Img 20240606 wa00121276257491443928373
Img 20240404 wa00162092919036315770776
Img 20240404 wa00132425955639205292116

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये