पर्यावरण दिन व प्रवीण दुधाने यांच्या वाढदिवसानिमित्त १५००० कुटुंबियांना तुळशीचे रोप वाटप..

कर्वेनगर : जागतिक पर्यावरण दिन व प्रविण दुधाने यांच्या वाढदिवसानिमित्त वारजे, कर्वेनगर मधील १५००० कुटुंबियांना तुळशीचे रोप वाटप करण्यात आले. Distribution of Tulsi saplings to 15000 families on the occasion of Environment Day and Praveen Dudhane’s birthday.
या तुळशी वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ आज लोकसेवक माणिक दुधाने यांच्या जनसंपर्क कार्यालयातून करण्यात आला. याप्रसंगी तेजल मयुर दुधाने, रोटरी क्लब ऑफ पुणे अध्यक्षा सारीका रोडे, सामाजिक कार्यकर्ते बाबा खान, गणेश गोकुळे, चैतन्य कांबळे, विशाल शिंदे, बन्सीलाल कन्होजिया, लोणकर काका, स्वप्नील खवले, सिद्धार्थ आबा भालेकर, संजीवनी जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य, समर्थ महिला बचत गट, रेणुका महिला बचत गटाच्या सदस्या आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या या संकट काळात नैसर्गिक ऑक्सीजन किती महत्वाचा आहे हे सर्वांनाच समजले. पर्यावरणाचा समतोल राखला तर शुद्ध ऑक्सीजन आपल्याला मिळू शकणार आहे. तुळशीचे रोप सर्वात जास्त ऑक्सीजन देणारे रोप आहे. त्यामुळे परिसरात तुळशीच्या रोपाचे मोठ्याप्रमाणावर वाटप करण्यात येत असल्याचे प्रवीण दुधाने यांनी सांगितले.



