लक्ष्मी दुधाने यांच्याकडून कष्टकऱ्यांना आनंदी दिवाळी भेट

कोथरुड : कर्वेनगर वारजे परिसरातील सफाई कर्मचारी, कचरावेचक कर्मचारी, कचरा घंटागाडीवरील कर्मचारी या सर्व सेवकवर्गास नगरसेविका लक्ष्मी दुधाने व राष्ट्रवादी काँग्रेस कोथरुड मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांच्या वतीने दिवाळी निमित्त दिवाळी भेट देण्यात आली.
सलग तीन दिवस टप्प्या टप्प्याने या दिवाळी भेटीचे वाटप कर्मचाऱ्यांमध्ये करण्यात आले. यावेळी सर्व कर्मचारी वर्गाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहिला मिळाला. दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.

या सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात कसलीही पर्वा न करता संपुर्ण परिसर स्वच्छ ठेवत कचरा उचलण्याचे काम अविरतपणे चालु ठेवले होते. त्यांनी केलेल्या स्वच्छतेच्या कामामुळे नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत झाली आहे. या कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदी जावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन केल्याचे स्वप्नील दुधाने यांनी सांगितले.


















