राष्ट्रीय

कर्नाटकमध्‍ये एसटी बस पाठवू नका : महाराष्ट्र पोलिसांची महामंडळाला विनंती

मुंबई : बेळगावमध्ये महाराष्ट्रातील सहा वाहनांची तोडफोड करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातून एसटी बस कर्नाटक राज्यात पाठवू नये, अशी विनंती महाराष्ट्र पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला केली आहे. कर्नाटकात महाराष्ट्रातील वाहनांच्या तोडफोडीची शक्यता लक्षात घेऊन बसेस पाठवू नये, असेही पोलिसांनी म्हटलं आहे.

बेळगावमध्ये कन्नड वेदिकेचे अध्यक्ष नारायण गैडा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सहा वाहनांची हिरेबागेवाडी टोलनाक्यावर तोडफोड करण्‍यात आली. याची गंभीर दखल महाराष्‍ट्राच्या पोलीस महासंचालकांनी घेतली आहे. सीमा भागातून जाणाऱ्या महामार्गांवर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि कायदा व सुव्यवस्था विभागाचे प्रमुख मिलींद भारंबे यांनी दिली आहे.

कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी लक्ष ठेवण्याचे आदेश सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्याचेही भारंबे यांनी सांगितले.

Img 20221126 wa02123601048173337149659

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये