कोथरुड

पुणे शहरात पार्किंग धोरणाची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने करू नये : दिपाली धुमाळ

पुणे : शहरात पार्किंग धोरणास मान्यता देत असताना, प्रथमत: प्रायोगिक तत्त्वावर पुणे शहरातील प्रमुख पाच रस्ते निश्चित करून, त्यावर योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार होती.  त्याचा अहवाल महापौरांच्या अध्यक्षतेखालील महापालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या समितीस सादर झाल्यानंतर योजनेची व्याप्ती संपूर्ण शहरभर राबवावयाची असे ठरवण्यात आले होते. परंतु अद्यापपर्यंत शहरातील पाच प्रमुख रस्ते निश्चित करून, प्रायोगिक तत्त्वावर योजना राबविणेत आलेली नसल्यामुळे त्याचा अहवाल  ही सदर झालेला नाही, असे असताना दर वाढवून पार्किंग धोरण राबवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे. शहरात नवीन पार्किंग धोरणाची अंमलबजावणी करताना ती चुकीच्या पद्धतीने केली जाऊ नये अशी मागणी धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. Don’t implement parking policy in Pune in wrong way: Deepali Dhumal

धुमाळ यांनी म्हंटले आहे की, पार्किंग धोरणाची प्रायोगिक तत्त्वावरील अंमलबजावणी न करताच, शहरातील सर्व बंदिस्त वाहनतळांमध्ये नवीन पार्किंग धोरणाचे दर लागू करण्याचा घाट घातला जात आहे आहे. नवीन पार्किंग धोरणाचे दर, हे मूळ दराच्या तिप्पट असून, सध्याच्या ‘कोरोना’ कालावधीच्या पार्श्वभूमीवर, पुणे शहरातील नोकरदार, सामान्य व्यापारी, व्यावसायिक, विद्यार्थी, कामगार महिलावर्ग, छोटे-मोठे दुकानदार इ. विविध घटकातील नागरिकांवर नाहक स्वरुपात या दरांचा बोजा पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणेकर नागरीक पूर्ण क्रयशक्ती अभावी निरनिराळ्या संकटांना तोंड देत आहेत. अशा परिस्थितीत त्यांचेवर या नवीन दरांच्या निमित्ताने अधिकचा भुर्दंड लादणे अन्यायकारक आहे.

Img 20210116 wa0007

सदर पार्किंग धोरणानुसार, नागरिकांनी आपली वाहने शहरातील रस्त्यांवर पार्किंग न करता, जास्तीत जास्त प्रमाणात महानगरपालिकेने विकसित केलेल्या बंदिस्त पार्किंग लॉटमध्ये पार्किंग करावीत, या उद्देशाने रस्त्यावरील पार्किंगचे दर जास्त प्रमाणात ठेवण्यात येऊन, बंदिस्त पार्किंग लॉट मधील दर कमी प्रमाणात ठेवणेत आलेले आहेत.

सद्यस्थितीत पुणे शहरातील बंदिस्त वाहनतळांमध्ये नवीन दरांचे अंमलबजावणी केलेस, रस्त्यांवरील पार्किंग मोफत व बंदिस्त वाहनतळांमध्ये तिप्पट दर, अशी मूळ ठरावाच्या विसंगत परिस्थिती निर्माण होऊन, रस्त्यावरील वाहनांची संख्या मोठया प्रमाणावर वाढून, त्याचा परिणाम वाहतुकीवर होऊन प्रदुषणात भर पडणार आहे त्यामुळे याबाबत गांभीर्याने नोंद घेणे आवश्यक असल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे.
      

संदर्भांकित ठरावाच्या अनुषंगाने, नवीन पार्किंग धोरणाची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने न करता मूळ ठरावास मान्यता देणेत आले प्रमाणे, प्रथमतः शहरातील प्रमुख पाच रस्ते निश्चित करून, त्या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करून, त्याचा अहवाल महापौर यांचे अध्यक्षतेखालील आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना सादर करावा, तरी या बाबतची पूर्तता झाले खेरीज शहरातील इतर कोणत्याही ठिकाणी नवीन दरांची अंमलबजावणी करू नये.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm
Img 20210128 wa0172

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये