राष्ट्रपती पदक विजेते कोथरूडचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगेंचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सत्कार

कोथरूड : कोथरुड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. मेघश्याम डांगे यांना प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती पदक जाहीर झाले. त्यांच्या प्रामाणिक सेवेची दखल प्रशासनाने घेतल्याने कोथरूड पोलीस ठाण्यात आनंदाचे वातावरण होते.त्यांच्या कार्याची ओळख असलेले सर्व हितचिंतक या निमित्ताने त्यांचे अभिनंदन करण्यास उत्सुक होते. पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने सरचिटणीस गिरीश गुरनानी यांनी ही श्री. डांगे याचे अभिनंदन व सत्कार केला.

गुरनानी म्हणाले “डांगे साहेब हे एक कर्तव्यदक्ष व प्रामाणिक पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्या अविरत कार्याचा गौरव आज प्रशासनाने व महामहीम राष्ट्रपतींनी केला या बद्दल त्यांचें हार्दिक अभिनंदन व प्रशासनाचे आभार. ही डांगेंबरोबरच कोथरूड साठीही अभिमानाची बाब आहे.” “अश्या प्रामाणिक अधिकाऱ्यांना जनतेच्या वतीने अधिकाधिक सहयोग होत रहावा जेणे करून त्यांच्या दैनंदिन पोलीस कार्यात आणखीन भर पडेल याची दक्षता सर्व स्थारतील नागरिकांनी घेणे गरजेचे आहे.” असे ही ते यावेळी म्हणाले.
यावेळी कोथरूड राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल गायकवाड,मिलिंद शिंदे, विशाल विचारे, सागर पळे, मंगेश भोंडवे, संतोष सोनावणे आदी उपस्थित होते.
