महाराष्ट्रराजकीय

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप ? शिंदे गटातील 22 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार, चर्चांना उधाण

शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांपैकी 22 आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटानं केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातील प्रसिद्ध सदर असलेल्या रोखठोकमधून हा दावा करण्यात आला आहे.

Img 20221021 wa00011331728156984263886

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना भाजपनं तात्पुरती व्यवस्था निर्माण केली आहे. त्यांची मुख्यमंत्रीपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, हे आता सगळ्यांना समजून चुकलं आहे, अशी टीका सामनाच्या रोखठोक सदरातून करण्यात आली आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांनी स्वतःबरोबर महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले. त्यामुळे महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजप स्वतःचे राजकारण करत राहील, असं म्हणत शिंदे गट आणि भाजपवर सामना रोखठोकमधून निशाणा साधला आहे.

Img 20221022 104558 1014877655567210833323

सामनातील रोखठोक सदरातून ठाकरे गटानं मुख्यमंत्री शिंदेंसह भाजपवर निशाणा साधला आहे. रोखठोकमध्ये म्हटलंय की, “महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा आहे. शिंदे गटाचे किमान 22 आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसते.” तसेच, “एकनाथ शिंदे यांनी स्वतःबरोबर महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले. त्यामुळे महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजप स्वतःचे राजकारण करत राहील.”

Img 20221019 143448 4921652329476299347948

मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे योगदान दिसत नाही. सर्वत्र देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. देशाच्या राजधानीत शिंदेंचा प्रभाव नाही. देवेंद्र फडणवीस मंगळवारी दिल्लीत गेले व मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या महत्त्वाकांक्षी धोरणांतर्गत धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेकडून महाराष्ट्र सरकारला हव्या असलेल्या जागेसाठी रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी घेऊन आले.”, असं रोखठोक सदरातून म्हटलं आहे. तसेच, सदरातून पुढे एकनाथ शिंदेंवर थेट निशाणा साधण्यात आला आहे. “धारावीच्या पुनर्विकासाचे संपूर्ण श्रेय त्यामुळे फडणवीस आणि भाजपकडे जाईल. या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या घोषणेत राज्याचे मुख्यमंत्री कुठेच नाहीत. पोलिसांच्या बदल्यांत आणि आपले अधिकारी नेमण्यात त्यांना जास्त रस आहे.”, असंही ते म्हणाले आहेत.

Img 20221023 wa0081

मुख्यमंत्री व त्यांचा गट सध्या काय करतो? मूळ शिवसेनेच्या प्रत्येक कामात अडथळे कसे आणता येतील ते सर्व करतो. ठाण्यातील ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमासाठी शिवसेनेस तलावपाळी परिसर मिळू नये यासाठी पुन्हा हायकोर्टात जावे लागले आणि ठाणे महानगरपालिकेने शिंदे गटाने सर्वप्रथम परवानगी मागितली या सबबीखाली खासदार राजन विचारे यांना परवानगी नाकारली. पण दसरा मेळाव्याबाबत शिवाजी पार्क मैदानासाठी हा नियम पाळला नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भाजपने या अशाच कार्यात गुंतवून ठेवले आहे.”, असं म्हणत थेट शिंदे गटावर निशाणा साधण्यात आला आहे.

Png 20221024 133102 0000
Img 20221024 wa00138587409767179987207
Img 20221024 wa00371497258486259953662
Img 20221024 wa00494898120075662566733
Img 20221024 wa0044871667030408772591
Fb img 1666533939031
Img 20221024 wa00421661058955266389431
Img 20221024 wa00127723618126263976558
Img 20211101 wa00118330850860855581379
Img 20211031 wa00066985050640051471264
Wp image3090221943230277582
Wp image5754610395278315591
Img 20221021 wa0475
Fb img 1666660333376
Img 20221022 wa0300
Screenshot 2022 10 24 09 16 55 04
Img 20221023 wa0082
Img 20221022 104615 9662214124455291312590
Img 20221022 104611 6206281284427559282707
Img 20221021 wa0416
Img 20221020 wa00071429831687423321840
Img 20221021 wa0478
Img 20221021 wa0473
Img 20221021 wa0474
Fb img 1666593843187
Img 20221021 wa0325
Img 20221024 wa0181
Screenshot 2022 10 19 10 52 53 83
Fb img 1666593631848
Fb img 1666593719680

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये