महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या राजकारणात उद्या परत भूकंप?

पुणे: राज्याच्या राजकारणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात वर्तवली जात असून या संदर्भात उद्या कोणती मोठी राजकीय घडामोड घडून मागील काही दिवस सुरू असलेल्या चर्चांना पूर्ण विराम मिळू शकतो.

राज्यातील जनतेला सध्या राजकीय भूकंप नवीन राहिले नाहीत. या राजकीय भूकंपाला जनता सरावली आहे असेही आता म्हंटले तर वावगे ठरणार नाही. सातत्याने नवनवीन बदल राज्याच्या सत्ताकारणात घडत असताना उद्या काय घडले तर नवल वाटायला नको.

सुरुवातीला झालेला देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा पहाटेचा शपथ विधी, त्यानंतर सत्तेत आलेली महाविकास आघाडी, शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सत्तेत आलेलं शिंदे फडणवीस सरकार व आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची घेललेली शपथ त्यामुळे, राज्यातील जनतेने या साडेतीन चार वर्षात अनेक अनपेक्षित बदल राजकारणात पाहिले आहेत.

आता एवढे होऊनही राजकीय उलथापालथ अजून थांबलेली नाही. काही तरी घडणार आहे आणि तेही लवकरच या बाबतची कुजबुज सध्या सुरू आहे. काही नेत्यांनी ट्विटर द्वारे केलेल्या विधानांमुळे त्याला जास्तीच खतपाणी मिळत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता कोणती नक्की घडामोड घडणार आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे ती मुख्यमंत्री बदलाची. मुख्यमंत्री बदलले तर एकनाथ शिंदे यांच्या जागी अजित पवार हे मुख्यमंत्री होतील असे बोलले जात आहे. या व्यतिरिक्त काही बदल झाल्यास तो धक्का मनाला जाईल. आज अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेल्यामुळे बदलाच्या चर्चा जोरात रंगू लागल्या असून सूत्रांकडून त्याला दुजोराही मिळत आहे.

Img 20230722 wa0007281292148512581060948719
Img 20230721 wa0011281297560579489566584655
Img 20230722 wa0006
Img 20230722 wa0005

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये