देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित असलेले सेवाकार्य मुरलीधर मोहोळ यांनी ‘दिव्यांग सहाय्यता अभियानाच्या’ माध्यमातून केले- चंद्रकांत पाटील

पुणे : संवेदनशील मनाच्या देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित असलेले सेवाकार्य मुरलीधर मोहोळ यांनी या दिव्यांग सहाय्यता अभियानाच्या माध्यमातून केले आहे. असे मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त भाजप प्रदेश सरचिटणीस व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात ‘दिव्यांग सहाय्यता अभियान’ आयोजित केले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पाटील बोलत होते. या उपक्रमाअंतर्गत २ हजार दिव्यांगांसाठी सुसह्य उपकरण वाटप, दिव्यांग रोजगार नोंदणी-मार्गदर्शन शिबीर आणि कृत्रिम अवयव मोजमाप आणि नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
पाटिल म्हणाले, या माध्यमातून दिव्यांगांसाठी विविध उपकरणाचे वाटप करण्यात येत आहे. दिव्यांगांमध्ये मोठ्या प्रमाणात कौशल्य असते. ते विकसित करण्यासाठीं विविध कोर्सेस उपलब्ध आहेत. त्यांना यासाठी माहिती देणे आणि मार्गदर्शन करण्याचे काम मोहोळ करीत आहेत. तसेच कृत्रिम अवयव तयार करण्यासाठीही मोजमाप आणि नोंदणी शिबिर आयोजित केले आहे. देवेंद्रजीना अपेक्षित असे सेवाकार्य मोहोळ यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

मोहोळ म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा आणि आशिर्वाद देण्यासाठी हे सर्व दिव्यांग बंधू भगिनी आले आहेत. त्यांनी दिलेले आशिर्वाद निश्चितच देवेंद्रजी यांच्या पर्यंत पोहोचतील आणि त्यांना महाराष्ट्रासाठी काम करण्यासाठी उर्जा देतील. दिव्यांग बांधवांना मदत करणे त्यांना आधार देणे आणि आत्मनिर्भर करणे या भावनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात 2000 दिव्यांगाना सुसह्य उपकरण व्हील चेअर, स्टिक वाटप येत आहे, दिव्यांग रोजगार नोंदणी, कृत्रिम अवयव मोजमाप आणि नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या माध्यमातून पुणे शहरात दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या भारत विकास परिषद या संस्थेला आर्थिक स्वरूपात लागणारी मदत देखील करण्यात येणार आहे. असेही मोहोळ म्हणाले.
यावेळी आयोजक मुरलीधर मोहोळ, माजी मंत्री सुनील कांबळे, रविंद्र अनासपुरे, अशोक येनपुरे, श्रीनाथ भिमाले,अभिनेते, दिग्दर्शक प्रविण तरडे, रमेश परदेशी आदी उपस्थित होते.









