महाराष्ट्र

उष्णतेची लाट; अशी घ्या काळजी

पुणे : महाराष्ट्रात उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. मुंबईत कमाल तापमान (Maximaum Temprature) 39 अंश सेल्सिअसच्या जवळपास, तर किमान तापमान (MInimum Temprature) 23 अंश सेल्सिअसच्या जवळपास पोहोचलं आहे. तसंच या आठवड्यात राज्यात तापमानाची तीव्रता आणखी वाढणार असून हवामान कोरडं असेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र (IMD)विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी उन्हात अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे आणि सतत पाणी प्यावे, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

राज्यातला हवा गुणवत्ता निर्देशांक बहुतांशी मध्यम किंवा समाधानकारक श्रेणीत नोंदवला जात असून, या आठवड्यातही तो त्याच श्रेणीत राहण्याची अपेक्षा असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. तसंच सध्या पावसाचीही शक्यता नाही. त्यामुळे आता मुंबईसह राज्यात सर्वत्र उन्हाचा तडाखा तीव्र होणार आहे. या आठवड्यात महाराष्ट्रातल्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये हवामान कसं असेल याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यावरूनही बहुतांश ठिकाणी उन्हाळ्याची तीव्रता वाढणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

पुण्यात (Pune) कमाल तापमान 35 अंश आणि किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दुपारी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर आठवडाभर हवामान स्वच्छ राहील. आठवड्याच्या अखेरीस कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. पालघर जिल्ह्यातील काही भागातही उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दादा गोधडी फाटल्यासारखा ट्रॅक फाटलाय नागरिकाची भर कार्यक्रमात थेट अजित पवारांकडे तक्रार
Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये