पुणे शहर

पालिका रुग्णालयातील कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांची रेमडिसिवर इंजेक्शन मिळवताना हाल, ८० टक्के ताब्यात आलेले खाजगी बेड डॅशबोर्डवर का दिसत नाहीत याचा लेखी खुलासा करा : धुमाळ, सुतार, बागुल यांची मागणी

पुणे : कोरोनाचा संसर्ग पुणे शहरात दिवसेंदिवस वाढत असून पुणे महापालिकेकडून कोरोना बाधितांवर उपचार करणेसाठी मनपाची रूग्णालये व सीसीसी सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत. मात्र या सेंटर्स मधील कोरोना बाधितांवर उपचार केले जात असताना आवश्यक असणारी रेमडिसिवर इंजेक्शन हे रूग्णांच्या नातेवाईकांना इतर मेडिकल मधून आणणेस सांगितले जात आहे. त्यामुळे नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून हा त्रास थांबवण्यात यावा अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार व काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केली आहे. Explain in writing why 80 per cent of received private hospital beds do not appear on the dashboard

कोरोना बाधीत रुग्ण रूग्णालयात दाखल झाला असता त्यावर उपचारासाठी आवश्यक सर्व प्रकारची औषधे त्याठिकाणी उपलब्ध असणे हे कायदयाने बंधनकारक आहे. यासाठी महापालिकेकडून कोटयावधी रूपये खर्च केले जातात. महापालिकेकडून सुविधा पुरविण्यासाठी व खरेदीसाठी कलम ६७ (३)(क) याचा वापर देखील चालू आहे. असे असतानाही रूग्णास आवश्यक असणारी औषधे (उदा.रेमडिसिवर इंजेक्शन) हे रूग्णांच्या नातेवाईकांना इतर मेडिकल मधून आणणेस सांगणे ही दुर्देवी बाब असल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे.

ही परिस्थिती आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही माहिती घेतली असता पुणे शहरात रेमडिसिवर इंजेक्शनचा काळा बाजार चालू आहे असे स्पष्ट झाले आहे. सदर बाब आम्ही लेखी पत्राद्वारे महानगरपालिका आयुक्त यांच्या निदर्शनास आणली आहे. रेमडिसिवर इंजेक्शन व इतर औषधे वेळेवर न मिळाल्याने व मिनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रूग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत असून नागरिकांची प्रचंड धावपळ होत आहे.

Img 20210223 wa0156

कालच पुणे मनपाच्या बाणेर येथील सीसीसी सेंटर/रूग्णालयातील तरूण रूग्णास रेमडिसिवर इंजेक्शन न मिळाल्याने त्याचे प्राण जातात का काय अशी परिस्थिती उदभवली होती. यावेळी सदर इंजेक्शन उपलब्ध करताना प्रचंड धावपळ झाली. पुणे महानगरपालिकेने खाजगी रूग्णालयातील ८० टक्के बेड ताब्यात घेतले अशा वर्तमानपत्रात बातम्या प्रसिध्द झाल्या, महापालिकेने याबाबत लेखी आदेश पारित केले. परंतू सदरचे बेड मनपाच्या प्रत्यक्षात ताब्यात आलेले नाहीत असे डॅशबोर्डवरून दिसून येत असल्याचं धुमाळ यांनी सांगितलं आहे. हे ८० टक्के ताब्यात आलेले बेड डॅशबोर्डवर का दिसत नाही याचा लेखी खुलासा करण्याची मागणी धुमाळ यांनी केला आहे.

शहरात एकही व्हेंटिलेटर/आयसीयु/ऑक्सिजन बेड शिल्लक नाही अशा बातम्या येत आहेत. तसेच मनपाने ताब्यात घेतलेल्या खाजगी रूग्णालयांमध्ये जे रूग्ण उपचारासाठी स्वतःहून दाखल होतात त्यांच्यावरील उपचाराच्या खर्चाचे व मनपाने संदर्भित केलेल्या रुग्णांच्या खर्चाचे नियोजन कसे व कोण करत आहे याबाबत महापालिकेकडून खुलासा व्हावा अशी मागणी महाविकास आघाडी तर्फे विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ, काँग्रेस पक्ष नेते आबा बागुल, शिवसेना पक्षनेते पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये