पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम पाषाणकर सुखरुप, पुणे पोलिसांनी जयपूर येथून घेतलं ताब्यात

पुणे : गेल्या काही दिवसांपासून गायब असलेले पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम पाषाणकर यांचा अखेर पोलिसांनी शोध घेतला आहे. गोतम पाषाणकर आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून २१ ऑक्टोबरपासून बेपत्ता झाले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथके त्यांचा तपास करत होती. मात्र मागील महिनाभरापासून त्यांचा तपास लागत नव्हता. परंतु आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पुणे पोलिसांनी गौतम पाषाणकर यांना जयपूर येथून ताब्यात घेतले आहे. जयपूर येथील एका हॉटेलमधून पोलिसांनी त्यांना सुखरूप ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान पोलिसांनी पाच ते सहा पथक करून राज्यातील वेगवेगळ्या शहरात त्यांचा शोध घेतला जात होता. काही दिवसांपूर्वी ते कोल्हापूरमध्ये असल्याचेही निष्पन्न झाले होते. परंतु त्यानंतर ते पुन्हा गायब झाले. आज अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना जयपूर येथील एका हॉटेलमधून सुखरूप ताब्यात घेतले आहे.










