राजकीय

प्रताप सरनाईक थेट सामना कार्यालयात संजय राऊत यांच्या भेटीला

मुंबई: सक्तवसुली संचलनालयाने (ED) कारवाईचा झटका दिल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक अखेर प्रसारमाध्यमांसमोर आले. त्यानंतर त्यांनी थेट ‘सामना’च्या कार्यालयात जाऊन शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली.

यावेळी संजय राऊत आणि प्रताप सरनाईक यांच्यात साधारण दीड तास चर्चा केली. ‘सामना’च्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या चर्चेत काय झालं हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. ‘ईडी’ने नक्की का कारवाई केली, माझ्या मुलाला का ताब्यात घेतले, याची माहिती मीदेखील अजून घेत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर प्रताप सरनाईक पुन्हा कुठे रवाना झाले, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.  त्यांच्यासोबत संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हेदेखील आहेत. त्यामुळे आता शिवसेनेच्या गोटातून प्रताप सरनाईक यांच्यासाठी मोर्चेबांधणी सुरु झाल्याची चिन्हे दिसत आहेत.

Img 20201114 wa0195
Img 20201118 wa0057
Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये