पुणे शहर

कोथरूड पौड रस्त्यावर भीषण अपघात ; भरधाव बसने दुचाकी स्वारांना उडवले.

कोथरूड: कोथरूड मधील पौड रस्त्यावर असणाऱ्या वनाज कंपनी समोर काल मंगळवारी रात्री भीषण अपघात घडला. खाजगी बसने भरधाव वेगात दोन दुचाकी स्वरांना उडवल्याने दोघे जण या अपघातात गंभीररित्या जखमी झाले आहेत. बसने दुचाकींसह रस्त्याला उभे असलेल्या पॅगो टेम्पो व जीपला धडक दिल्याने त्या वाहनांचे हे नुकसान झाले आहे.

ही घटना मंगळवारी रात्री ८.२० वाजण्याच्या सुमारास घडली. धडक एवढी भीषण होती की, एका दुचाकी स्वराच्या मानेत गाडीचा पार्ट घुसला गेला. हा मानेत घुसलेला भाग काढण्यासाठी बरीच कसरत जमलेल्या नागरिकांना करावी लागली.

कोथरुडकडुन चांदणी चौकाकडे जाणाऱ्या खाजगी बसने(एम एच १२ एच यु ३९८२) भरधाव वेगात दुचाकीस्वारांना उडवले. या अपघातात अर्थव अशोक महाजन, (वय २० वर्षे रा. आंबेडकर हॉस्टेल घोले रोड शिवाजीनगर) व अथर्व कांताराव सातपुते (वय 21 रा. डावी भुसारी कॉलनी कोथरूड) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

बस एवढ्या वेगात होती की तिने दुचाकी स्वरांना उडवत रस्ताच्या कडेला थांबलेल्या पॅगो रिक्षा क्रमांक एम एच १२ ५५२० व महिंद्रा मॅक्स जीप क्रमांक एम एच १२ सी आर ३९५८ या दोन वाहनांनाही जोरात धडक दिली व त्यांचे नुकसान केले. रवींद्र पंढरीनाथ भिलारे राहणार सुतारदरा  यांनी याबत फिर्याद दिली आहे. बस चालक  बाळु भाऊसाहेब पवार, (वय ४५ वर्षे, रा. आगा गॅरेज, चाफेकर चौक, चिंचवड,) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघात घडताच कोथरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर, बालाजी सानप पोलीस उपनिरीक्षक बी.एम माळी यांनी घटनास्थळाला भेट दिली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र अळेकर करत आहेत.

Fb img 16474137314571819310932637888379
Img 20240404 wa00134916733315783821383
Img 20240404 wa00123413096165072096535

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये