कोथरुडपुणे शहर

मनसेच्या माध्यमातून वाढीव वीज बिलांच्या तक्रारी आणि शंकांचे निरसन

पुणे : पुन्हा एकदा महावितरण कार्यालयामध्ये मनसे सरचिटणीस ॲड.किशोर शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मनसेकडे दाखल झालेल्या तक्रारी अर्जांपैकी सुमारे ५० नागरिकांच्या वीज बिलासंदर्भातील तक्रारी आणि शंकांचे निरसन करण्यात आले.

यावेळी अनेक नागरिकांनी वीज मीटर रीडिंग बाबत आक्षेप नोंदवला. त्यांना वीज मीटर तपासण्याचे आश्वासन देण्यात आले. तर बहुतांश नागरिकांना एकाच वेळी वीज बिलाची रक्कम भरता येणे शक्य नसल्यामुळे विज बिल भरण्यासाठी टप्पे करून देण्यात आले.त्यावेळी मनसेच्या वतीने गणेश शिंदे,संजय काळे,श्रीकांत अमराळे,रोहित मोकाटे उपस्थित होते.

गणेश शिंदे म्हणाले, यापुढेही टप्प्याटप्प्याने मनसेकडे दाखल तक्रारी अर्जांच्या शंकांचे निरसन अथवा दुरुस्ती महावितरण कार्यालयाकडून करण्यात येईल.आत्तापर्यंत ४०० हून अधिक नागरिकांच्या शंकांचे निरसन व बिलांची दुरुस्ती मनसेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

8 3
Screenshot 2020 10 11 11 07 57 41 2
Screenshot 2020 10 11 11 02 04 84 3
Screenshot 2020 10 12 12 19 40 67

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये